लिंगबदलप्रकरणी महिलेची उच्च न्यायालयात धाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

मुंबई - लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेमुळे वादात सापडलेल्या बीडमधील पोलिस महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठांनी वैद्यकीय रजा मंजूर करावी, अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली आहे.

मुंबई - लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेमुळे वादात सापडलेल्या बीडमधील पोलिस महिलेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठांनी वैद्यकीय रजा मंजूर करावी, अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली आहे.

बीड येथील 28 वर्षांची ही महिला पाच वर्षांपासून पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहे. लहानपणापासूनच विशिष्ट शारीरिक रचनेमुळे स्त्रीपेक्षा पुरुष गुणांचे आकर्षण मला अधिक वाटते. शरीरातील संप्रेरके बदलण्याच्या प्रक्रियेमुळे पुरुष म्हणून वावरण्याचा निर्णय मी घेतला आहे, त्यासाठी आवश्‍यक "वाय' गुणसूत्रांचे प्रमाण शरीरामध्ये अधिक आहे. त्यामुळे लिंगबदलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एक महिना सुटी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका तिने न्यायालयात केली आहे.

याआधी तिने बीडमधील वरिष्ठ पोलिस अधीक्षकांकडे याबाबत विनंती अर्ज केला होता. मात्र, त्यांनी रजा नाकारली. शस्त्रक्रियेमुळे नोकरीवरही पुनर्निवडीची वेळ येऊ शकते, असेही अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे धास्तावलेल्या महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली.
शस्त्रक्रियेबाबत तिने जे जे सरकारी रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी व समुपदेशक सल्ला घेतला आहे. तिच्या शरीरात संप्रेरकांची असमानता असल्यामुळे गरज वाटल्यास ती लिंगबदल शस्त्रक्रिया करू शकते, असा अहवाल रुग्णालयाने दिला. शस्त्रक्रिया हा माझा मूलभूत अधिकार आहे, असा दावा तिने केला आहे.

Web Title: mumbai news sexual harassment case, the woman went to the High Court