शाहरूख खानकडून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरूखने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरूखने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

दर वर्षीप्रमाणे यंदाही अभिनेता शाहरूख खानने मुलगा अबरामसोबत बाल्कनीत येऊन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला की, तुम्हा सर्वांना घरी बोलावण्याचा प्रयत्न करीन. त्यानंतर शाहरूखने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत ईद साजरी केली. या वेळी शाहरूख म्हणाला की, मी ज्या ज्या ठिकाणी गेलो, त्या त्या ठिकाणी चाहत्यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले आहे. ईदनिमित्त मी मुलांसाठी जेवण बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. शाहरूखचा आगामी चित्रपट "जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटातील "इंटरकोर्स' या शब्दाविषयी विचारल्यानंतर तो म्हणाला की, हा चित्रपट पाहिल्यानंतर या शब्दात विशेष काहीच नाही, हे लक्षात येईल. 

पत्रकार परिषदेत त्याच्या मुलांच्या करियरबाबत विचारण्यात आले. त्या वेळी शाहरूख म्हणाला की, मुलांनी आधी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. माझ्या मुलीला अभिनेत्री बनायचे असेल, तर तिने आधी शिक्षण पूर्ण केले पाहिजे. प्रत्येक मुलाकडे कमीत कमी पदवीपर्यंतचे शिक्षण असलेच पाहिजे. 

Web Title: mumbai news shahrukh khan ramzan eid