थोर व्यक्तींबाबतचा मनातला आदर्श उतरला पानावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

शिवडी - थोर व्यक्तींबाबतचा आपल्या मनातला आदर्श हुबेहूब पानावर उतरून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांनी लिहिलेल्या ‘मनातली माणसं’ या पुस्तकात उत्तमरीत्या करण्यात आला आहे, असे गौरवोद्‌गार ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. ‘सिद्धार्थ प्रकाशन’ प्रकाशित ‘मनातली माणसं’ पुस्तक प्रकाशनाचा सोहळा शनिवारी (ता. १७) परळ-भोईवाडा येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. 

आपल्याला विविध क्षेत्रांमधील वेगवेगळ्या मान्यवरांकडून मिळालेले मौलिक योगदान आजच्या पिढीला कसे उपयुक्त ठरेल, या उद्देशाने नार्वेकर यांनी लिहिलेले ‘मनातली माणसं’ हे पुस्तक माणसाला माणूस म्हणून जोडण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. तरुण पिढीला थोर मान्यवरांचा इतिहास या पुस्तकातून कळणार आहे. माणसांबद्दलचा जिव्हाळा, प्रेम, माया, शिकवण अशा चौकटीत या पुस्तकाचे वर्णन करण्यात आले आहे. हे पुस्तक नव्या पिढीला नक्कीच मोलाचे ठरेल, असे पवार म्हणाले. सध्याच्या पिढीला वाचनाबाबत आस्था राहिली आहे का? अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे म्हणाले, की आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर श्रम केल्याशिवाय पर्याय नाही. आज अनेक चढ-उतारांचा सामना करीत आपले ध्येय नार्वेकर यांनी गाठले आहे. त्यांना जी माणसे भेटली आणि ज्यांनी त्यांच्या मनात ठसा उमटवला, अशा माणसांवर आधारित असणाऱ्या या पुस्तकाचा महाराष्ट्राचे सर्वेक्षण करण्यासाठी तरुण पिढीला उपयोग होईल. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक म्हणाले, की मन आणि बुद्धी सर्वांनाच असते. बुद्धी आपले काम करते; पण जो व्यक्ती मन जागृत ठेवून कार्य करतो तोच यशाचे शिखर गाठतो. मन जागृत ठेवणे ही मोठी किमया आहे. ती किमया नार्वेकरांच्या या पुस्तकात दिसून येत आहे. 

शेकडो लेखक तयार होवोत
आपल्या भावना व्यक्त करताना राधाकृष्ण नार्वेकर म्हणाले, की माझ्या जीवनाला आकार देणारी माणसे शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यांतही आहेत. त्यांचा आदर्श, सामाजिक प्रेम डोळ्यांपुढे ठेवून सतत कार्यरत राहिलो म्हणून मी घडलो. ज्यांच्यामुळे घडलो त्या माणसांचे चरित्र ‘मनातली माणसं’ या पुस्तकात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकातून शेकडो लेखक तयार होतील, अशी आशा आहे.

Web Title: mumbai news sharad pawar book