विकासकामांत शिवसेना जात-पात पाहत नाही: आमदार भोईर

संजीत वायंगणकर
मंगळवार, 9 जानेवारी 2018

कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या निळजे येथील लोढा हेवन गृहसंकुलात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी  उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आमदार भोईर पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात संविधान निर्माण करून दिले.

डोंबिवली : शिवसेना हा राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारा एकमेव पक्ष आहे. जनतेची कामे करताना आम्हाला नेहमीच आनंद वाटत राहिला आहे. म्हणून शिवसेना नेहमीच जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन काम करीत असते, अशी भावना आमदार सुभाष भोईर यांनी निळजे येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह उभारणीच्या माध्यमातून आमदार भोईर यांनी समाजाला एकोप्याचा संदेश दिला.

कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या निळजे येथील लोढा हेवन गृहसंकुलात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी  उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना आमदार भोईर पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात संविधान निर्माण करून दिले. महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे शिवशक्ती - भिमशक्ती एकोप्याने नांदत आहे. यापुढे देखील हा समाज विकास कामांसाठी  संघटित राहील त्यामुळे अनेक विकासाची कामे होत राहतील असे त्यांनी सांगितले. आमदार सुभाष भोईर यांच्या आमदार निधीतून लोढा हेवन निळजे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह उभाण्यात येणार असून त्यासाठी 15 लाख रुपयांचा आमदार निधी देण्यात आला आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर उपतालुका प्रमुख बंडू पाटील, नगरसेवक प्रभाकर जाधव, नगरसेविका पूजा पाटील, युवासेना तालुका प्रमुख योगेश पाटील, गजानन पाटील, उपतालुका संघटक भगवान पाटील, विभाग प्रमुख  हरेश पाटील, शाखाप्रमुख सतीश पाटील, माजी सरपंच रवींद्र पाटील, पंचशील सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा सविता कांबळे, विनायक साळवी, तुषार मोरे, बबन कांबळे, विलास कांबळे, चंद्रकांत हाटे, किरण सावंत, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 711 चे सर्व सभासद उपस्थित होते. 

Web Title: Mumbai news Shiv Sena leader Subhash Bhoir statement