शिवाजी पार्क शांतता क्षेत्रातून बाहेर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

मुंबई - राज्य सरकारने मुंबईतील 110 शांतता क्षेत्रांची यादी जाहीर केली असून, यामध्ये अनेक राजकीय घडामोडींचे साक्षीदार असलेल्या शिवाजी पार्कचा समावेश करण्यात आलेला नाही. या यादीत अवघ्या सात धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने शहरातील 110 शांतता क्षेत्रांची यादी तयार करून ती राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे पाठवली होती. या यादीत शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि न्यायालयाच्या परिसरांचा शांतता क्षेत्रात प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र यात शिवाजी पार्कच्या बाजूच्या बालमोहन विद्यामंदिर या शाळेचा समावेश नसल्याने शिवाजी पार्क मैदान शांतता क्षेत्रातून बाहेर पडले आहे. शिवाजी पार्क शांतता क्षेत्रात असल्याने शिवसेनेचा दसरा मेळावा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळाव्याबरोबरच इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी कोंडी होत होती. ती आता फुटण्याची शक्‍यता आहे.
Web Title: mumbai news shivaji park