आदिवासी नेत्याने दणाणून सोडले शिवसेना भवन! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मुंबई  - शिवसेना भवनात शिवसेनेचाच आवाज घुमत असला, तरी एका आदिवासी नेत्याने ही वास्तू अचानक दणाणून सोडल्याची घटना नुकतीच घडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हा नेता दूरच्या गावाहून आला होता. गावाकडील शिवसैनिकांना साहेब आज भेटणार नाहीत... निघा निघा इथून, असे सांगत हुसकावून लावणाऱ्या एका अधिकाऱ्याला या आदिवासी नेत्याने झापले. दूरवरून आपल्या नेत्याला भेटायला येणाऱ्या शिवसैनिकांशी सौजन्याने वागता येत नसेल, तर किमान उर्मटपणे वागू नका, अशीही कानउघाडणी त्याने केली. 

गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे शिवसेना भवनात नेत्यांसोबत विशेष बैठक घेत आहेत, अशी माहिती मिळाल्याने उत्तर महाराष्ट्रातील हा आदिवासी नेता त्यांना भेटण्यासाठी आला होता. ठाकरे यांच्या दालनाबाहेर तो उभा होता. मराठवाड्यातील काही शिवसैनिक पुष्पगुच्छ घेऊन ठाकरे यांना भेटण्याची वाट पाहत होते. या आदिवासी नेत्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. उत्तर महाराष्ट्रातील भिल्ल समाजातला हा लोकप्रिय नेता आहे. ठाकरे यांना दालनात निरोप देण्यासाठी कागदावर आपले नाव लिहून देत होता. तितक्‍यात तिथला एक अधिकारी जवळ आला. चला, चला, साहेब कोणालाही भेटणार नाहीत, असे म्हणत त्याने सगळ्यांना खाली जाण्यास सांगितले. पण, हा आदिवासी नेता जागचा हलला नाही. त्या अधिकाऱ्याने या नेत्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या या नेत्यानेही मग आवाज चढवला. त्यावर दालनात बसलेले उत्तर महाराष्ट्रातील एक मंत्री बाहेर आले आणि या नेत्याला पाहताक्षणीच "अहो, काय झाले? जाऊ द्या. जाऊ द्या... ते मोठे नेते आहेत' अशी मध्यस्थी करत त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: mumbai news shivsena bhavan