गोराईतील शिवसेना-भाजप नगरसेविकांमध्ये हमरीतुमरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

मुंबई : गोराईमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये शुक्रवारी झालेल्या हमरीतुमरीप्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल झाल्याने बोरिवली पोलिसांनी मारहाण, धमकावणे आणि विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल केले आहेत.

स्थानिक व्यायामशाळा आणि कचऱ्याचे डबे यामुळे वाद निर्माण झाला. भाजपच्या कार्यकर्त्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याने शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांच्या पतीच्या अंगरक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय शिवसेना कार्यकर्त्यांच्या तक्रारीनुसार, भाजप कार्यकर्त्यांनी वाद उकरून हात धरल्याप्रकरणी आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या गोराई येथील नगरसेविका अंजली खेडकर गोराई उद्यानातील समाज मंदिराची पाहणी करत असताना तेथे त्यांना 500 हून अधिक नवे कचऱ्याचे डबे आढळले. याबाबत त्यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता शिवसेना नगरसेविका संध्या दोशी यांनी हे डबे नागरिकांना वितरित करण्यासाठी त्यांच्या मागील कारकिर्दीत घेतले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार कळताच दोशी आणि त्यांचे पती विपुल दोशी कार्यकर्त्यांसह तेथे गेले. तेथे दोन्ही नगरसेविकांमध्ये बाचाबाची झाली. त्या वेळी विपुल दोषी यांच्या अंगरक्षकाने खेडकर यांच्या कार्यकर्त्याला पिस्तुलाने धमकावले. त्याच्यावर बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचा कार्यकर्ता आदित्य पांडे याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच या मैदानात सुरू असलेल्या व्यायामशाळेचे बांधकामही बेकायदा असल्याचा आरोप भाजपने केला; मात्र 2010 मध्येच नगरसेवक निधीतून ही व्यायामशाळा बांधण्यात आली होती; मात्र आता ही फाईल मिळत नसल्याचा बनाव अचानक पालिका प्रशासन करत असल्याचा आरोप दोशी यांनी केला.

प्रश्‍न महासभेत नेणार ः खेडकर
कचऱ्याचे डबे दोन वर्षे वितरित न करणे म्हणजे करदात्यांचा पैसा कचऱ्यात टाकण्याचा प्रकार आहे. हा प्रश्‍न महासभेत उपस्थित करणार असल्याचे खेडकर यांनी सांगितले. संध्या दोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो होऊ शकला नाही.

Web Title: mumbai news shivsena bjp corporator politics