शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ध्वनिप्रदूषण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दर वर्षीप्रमाणे यंदाही नेत्यांच्या भाषणबाजीने आवाजाच्या पातळीचा मर्यादाभंग केल्याचे आवाज फाउंडेशनच्या नोंदीतून स्पष्ट झाले आहे. संजय राऊत यांच्या भाषणाच्या वेळी आवाजाची पातळी 96.2 डेसिबल नोंदवली गेली. या मेळाव्यातील त्यांच्या भाषणामुळे सर्वाधिक ध्वनिप्रदूषण झाल्याचे आवाज फाउंडेशनच्या नोंदी सांगतात. आवाज फाउंडेशनच्या वतीने दर वर्षी दसरा मेळाव्यातील आवाजाच्या पातळीची मोजणी करण्यात येते. यंदाही आवाजाची पातळी मोजण्यात आली. कार्यकर्त्यांच्या सुरवातीच्या घोषणांचा आवाज 60 डेसिबलपर्यंत होता. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पहिले भाषण केले. त्यांच्या आवाजाची पातळी 92 डेसिबलपर्यंत होती.
Web Title: mumbai news shivsena dasara melava sound polution