Shivsena : सत्तासंघर्ष! मुंबईकरांमध्ये धाकधूक; सर्वोच्च निकालाचं काऊंटडाऊन सुरू

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Sakal Digital

मुंबई - मुंबईरांचे डोळे सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहेत. कुंपणावर असलेल्या नगरसेवक आणि आमदार यांच्यापुढे आता पेच निर्माण झाला आहे. त्यांच्यामध्ये निकालाबाबत धाकधूक सुरू आहे.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Exam : नीट परीक्षेपूर्वी विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्र तपासले; प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल

सत्ता संघर्षाला येत्या जून महिन्यात एक वर्षे होईल. त्यापूर्वीच उद्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. गुवाहाटी, गोवा आणि महाराष्ट्र असा सत्ता संघर्ष झाल्याचे राज्याने पाहिले. राज्यात यापूर्वी असा पेच कधीच निर्माण झाला नव्हता. सत्ता संघर्षाचा वाद थेट सर्वोचेच न्यायालयात पोचला. त्यामुळे सर्वोच्य न्यायालय आता अंतिम निकाल काय देणार याकडे मुंबईकरांचे डोळे लागले आहेत. (Latest Marathi News)

Eknath Shinde vs Uddhav Thackeray
Shivsena Case : सत्तासंघर्षावर निकाल देण्यापूर्वी CJI चंद्रचूड म्हणाले, "उद्याची सकाळ..."

शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) या दोन पक्षांच्या अस्तित्वाचा उद्या फैसला असून सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याबाबत सर्वात जास्त उत्कंठा या दोन पक्षांना लागली आहे. निकालानंतर पुढे काय भुमिका घ्यायची याबाबत आता मुंबईतील दोन्ही पक्षांमध्ये मोठा खल सुरू आहे. त्या पक्षांच्या कार्यरर्त्यांमध्ये कमालिची धाकधूक आहे. (Breaking Marathi News )

सत्तेचा डाव विस्कटणार काय विषयीच आता चर्चा सुरू असून त्याचेच काऊंटडाऊन सुरू आहे. राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये उद्या काय निकाल .येणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com