"सिद्धीसाई' इमारतप्रकरणी महत्त्वाचे पुरावे हाती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई - घाटकोपर येथील "सिद्धीसाई' इमारत दुर्घटनेप्रकरणी अटक झालेले सुनील शितप व अनिल मंडल यांच्या व्हॉट्‌सऍप संभाषणातून काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. न्यायालयाने दोघांनाही 7 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

"सिद्धीसाई'मधील सुनील शितप याच्या मालकीच्या तळमजल्यावरील खोली क्रमांक 1, 2 व 3 मधील भिंती व इमारतीतील आरसीसी पिलर तोडून एकच मोठा हॉल बनवण्यात येत होता. त्यामुळे ही इमारत कोसळल्याचे प्राथमिक तपासात निषन्न झाले होते. या कामावर देखरेख करण्याची जबाबदारी मंडल याच्यावर होती. मजुरांची मजुरी देणे, बांधकामासाठी माल खरेदी करणे, बांधकामावर लक्ष ठेवणे आदी कामे शितपने मंडलवर सोपवली होती. त्यासाठी मंडल थेट शितपच्या संपर्कात होता. दोघांच्या व्हॉट्‌सऍप व मोबाईलवर झालेल्या संभाषणातून महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सिद्धीसाई इमारत दुर्घटनेतून वाचलेले लालचंद जेसाराम रामचंदानी यांच्या तक्रारीवरून पार्क साइट पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मंगळवारी दाखल केला.

Web Title: mumbai news siddhisai building important proof receive