समृद्धी महामार्गासाठी सिडकोकडून 200 कोटी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

नवी मुंबई - बहुचर्चित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाविरोधात वातावरण तापले असतानाच, सिडकोने या महामार्गासाठी 200 कोटींचे कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. सिडकोकडून सुमारे साडेसात टक्के व्याज दराने कर्जरूपाने निधी दिली जाणार असून, काही वर्षांनंतर "एमएसआरडीसी'कडून सिडकोला पैसे परत दिले जाणार आहेत, अशी माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली.

"एमएसआरडीसी'ने सिडकोकडे एक हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, सध्या सिडकोकडून विमानतळ, मेट्रो रेल्वे, नेरूळ-उरण रेल्वेबरोबरच अनेक महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे एवढी मोठी रक्कम न देता प्रशासनाकडून 200 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविण्यात आली. समृद्धी मार्गाच्या उभारणीसाठी "एमएसआरडीसी'ने एमएमआरडीए, एमआयडीसी, एसआरए आणि म्हाडाकडे निधीची मागणी केली आहे. या प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला जमीनधारकांना देण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे.

Web Title: mumbai news sidko 200 crore to samruddhi highway