पाठिंब्यासाठी कुलगुरूंची स्वाक्षरी मोहीम 

नेत्वा धुरी
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई - कुलगुरूंनी घातलेला निकाल गोंधळ निस्तरायला ऑक्‍टोबर उजाडण्याची शक्‍यता असताना परतीचा मार्ग सुकर होण्यासाठी समर्थकांनी क्‍लृप्त्या लढवायला सुरुवात केली आहे. संजय देशमुख यांना परत आणण्यासाठी धडपडणाऱ्या एका गटाने विद्यापीठातील प्राध्यापकांची स्वाक्षरी मोहीम राबवण्याचा उद्योग आठवड्याभरापासून सुरू केला आहे. प्राध्यापकांच्या वर्तुळात याबाबचे फिरत असलेले ई-मेल "सकाळ'च्या हाती लागले आहेत. 

मुंबई विद्यापीठाच्या उर्वरित विषयांचा निकाल लवकरात लवकर संपवून प्रभारी कुलगुरूंसह नवी टीम आपापल्या विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे ही टीम माघारी गेल्यानंतर विद्यापीठाला वाली कोण? या मुद्द्यावर देशमुखांनी प्राध्यापकांना विश्‍वासात घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी समर्थकांची एक टीमच कार्यरत झाली आहे. सरकारी पातळीवरील रोष कमी करण्यासाठी प्राध्यापकांची स्वाक्षरी मोहीम राबवून देशमुख परत यावेत ही प्राध्यापकांचीच इच्छा असल्याचे दाखविण्याचा आटापिटा करण्यात येत आहे. यासाठी समर्थकांनी या मोहिमेचा ई-मेलच सगळ्या प्राध्यापकांना धाडला आहे; मात्र या मोहिमेला अल्प प्रतिसाद असल्याने पुन्हा नवी क्‍लृप्ती शोधण्यात कुलगुरूंची टीम गुंतली आहे. 

देशमुख यांना दुसरी नोटीस 
आता केवळ दोनच विषयांचे निकाल बाकी असल्याने निकाल गोंधळाविरोधातील कारवाईची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना दुसरी कारणे दाखवा नोटीस धाडल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगली आहे. पहिल्या नोटिशीचे उत्तर समाधानकारक नसल्याचे ताशेरे या पत्रात ओढले गेल्याचे कळते. त्यामुळे कुलगुरूंना दुसऱ्या कारणे दाखवा नोटिशीमध्ये दुसऱ्यावर बोट ठेवता येणार नाही, अशी माहितीही सूत्रांनी दिली. या नोटिशीला कुलगुरूंनी समाधानकारक उत्तर दिले नाही, तर तत्काळ त्यांचे निलंबन होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे.

Web Title: mumbai news Signature campaign Vice Chancellor