मंडईचा स्लॅब कलंडला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

तुर्भे - वाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या भाजी मंडईचा स्लॅब कलंडला आहे; परंतु पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला टेकू लावण्यासाठी लोखंडी खांबाचा वापर केला आहे. त्यामुळे सात मजल्यांच्या या इमारतीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

वाशी, सेक्‍टर १४ येथील भूखंड क्रमांक चार-पाचवर नवी मुंबई महापालिकेच्या सात मजली भाजी मंडईच्या इमारतीचे काम सुरू आहे. सध्या तिचे दोन मजल्यांचे काम झाले असून तीन स्लॅब टाकले आहेत; मात्र हे काम निकृष्ट असल्याचे उघड झाले आहे. येथील तिन्ही स्लॅब एका बाजूला झुकले आहेत. हा प्रकार पालिका आयुक्तांच्या लक्षात येऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला लोखंडी खांबांचे टेकू दिले आहेत. विशेष म्हणजे हे स्लॅब एक फूट जाडीचे असताना त्यांना टेकू देण्यासाठी वापरलेले लोखंडी खांब त्यापेक्षा अधिक मोठे आहेत. या लोखंडी खांबांचे वजन ही निकृष्ट इमारत पेलणार का, असाही प्रश्‍न यामुळे निर्माण झाला आहे.

ही इमारत धोकादायक नाही, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लेखी द्यावे. जर असे झाले तर प्रशासन दोषी ठरेल. त्यामुळे ही इमारत पडून पुन्हा नव्याने तिचे बांधकाम सुरू करण्याची मागणी पालिका आयुक्त रामास्वामी यांच्याकडे करणार आहे.
- गजानन काळे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष, मनसे

Web Title: mumbai news slab