सोशल मीडियावरील 50 पोस्ट हटवल्या 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

मुंबई - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारानंतर सोशल मीडियावरील 50 आक्षेपार्ह व प्रक्षोभक पोस्ट मुंबई पोलिसांनी हटवल्या आहेत. या प्रकरणी फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्विटरसारख्या माध्यमांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. 

कोरेगाव-भीमामधील घटनेचे पडसाद मुंबईत उमटल्यानंतर काही आंदोलकांनी कायदा हातात घेत ठिकठिकाणी वाहनांची तोडफोड आणि रास्ता रोको केला. पोलिसांच्या निरीक्षणानुसार, सकाळी 10 वाजण्यापूर्वी आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर समाजभावना भडकवणाऱ्या, तसेच अफवा पसरवण्यास मदत करणाऱ्या पोस्ट्‌स सोशल मीडियावर पसरवण्यास सुरुवात केल्यानंतर आंदोलकांनी कायदा हातात घेण्यास सुरुवात केली. परिस्थिती चिघळत गेल्याने मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेश दिले. या प्रकरणी शहरात 25 गुन्हे नोंदवून 37 जणांना अटक, तर 250 जणांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या प्रकरणी राज्यात एकूण 120 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 

Web Title: mumbai news social media post