सोशल मीडियावर 'सेव्ह आरे फॉरेस्ट'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई - 'आरे'च्या हरितपट्ट्याला वाचविण्यासाठी आरेप्रेमींनी पुन्हा सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. "सेव्ह आरे फॉरेस्ट' या हॅशटॅगसह सहा लाख 74 हजार 503 लोकांनी "आरे' वाचविण्याचे आवाहन सोशल मीडियावर केले आहे. मिस कॉलला दोन लाख भारतीयांनी पाठिंबा दिला आहे.

मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "आरे'तील जंगलाची कत्तल करून मेट्रो 3चे कारशेड उभे राहत आहे. "आरे"तील मेट्रो-3च्या कारशेडला विरोध करण्यासाठी "सेव्ह आरे' आणि "सेव्ह आरे कॉन्झर्वेशन ग्रुप'च्या माध्यमातून अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठात आरेच्या प्रकरणावर मंगळवारी (ता. 16) सुनावणी होणार आहे. या वेळी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमींनी दिलेल्या मिस कॉल ऍलर्टची माहिती सर्वांसमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती सेव्ह आरे कॉन्झर्वेशन ग्रुपचे सदस्य यश मारवाह यांनी दिली.

या मिस कॉलला चित्रपट तारे-तारकांनीही प्रतिसाद दिला. संगीतकार, गायक विशाल दादलानी, छायाचित्रकार अतुल कसबेकर, अभिनेत्री दिव्या दत्ता आदींनी "आरे' वाचवण्याच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

"आरे'त आग
"आरे'च्या काही भागांत रविवारी (ता. 14) रात्री आग लागली होती. रॉयल पाम येथील भागांत वणवा लागल्याचे नीलेश धुरी यांनी सांगितले. आग वेळीच नियंत्रणात आल्याने अनर्थ टळला.

Web Title: mumbai news social media save aare forest