सोहराबुद्दीन चकमक प्रकरण आणखी दोन साक्षीदार फितूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यामध्ये सोमवारी (ता. 26) विशेष सीबीआय न्यायालयात आणखी दोन साक्षीदार फितूर झाले. त्यामुळे आता फितूर साक्षीदारांची संख्या 44 वर पोचली आहे.

मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यामध्ये सोमवारी (ता. 26) विशेष सीबीआय न्यायालयात आणखी दोन साक्षीदार फितूर झाले. त्यामुळे आता फितूर साक्षीदारांची संख्या 44 वर पोचली आहे.

गुजरात पोलिसांनी सोहराबुद्दीनची बनावट चकमकीत हत्या केली, असा आरोप त्याच्या भावाने केला आहे. यासंबंधीचा खटला मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुरू आहे. सोमवारी दोन पंच साक्षीदारांची जबानी विशेष न्या. एस. जे. शर्मा यांच्यापुढे घेण्यात आली. मात्र, पोलिसांनी घेतलेल्या जबाबाच्या विरोधात दोघांनीही जबानी दिली. पोलिसांनी कोऱ्या कागदांवर आमची स्वाक्षरी घेतली, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे दोघांनाही फितूर घोषित करण्यात आले. आतापर्यंत एकूण 62 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यापैकी 44 जण फितूर घोषित झाले आहेत. गांधीनगरमध्ये नोव्हेंबर 2005 मध्ये शेखची पोलिसांबरोबर चकमक झाली होती, असा अभियोग पक्षाचा आरोप आहे.

Web Title: mumbai news soharabuddin case crime witness