युद्धातील जखमी १९ जवानांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

सायन - युद्धावेळी जखमी होऊन अपंगत्व आलेल्या १९ भारतीय जवानांचा शुक्रवारी (ता. २६) प्रजासत्ताक दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात सत्कार करण्यात आला. षण्मुखानंद संगीत सभेचे माजी अध्यक्ष दिवंगत डॉ. व्ही. सुब्रमण्यम यांचे शताब्दी वर्ष व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले दिव्यांग कलाकारांनी व्हिलचेअरवरून सादर केलेला ‘अनस्टॉपेबल’ हा कार्यक्रम.

षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या विशेष कार्यक्रमात व्हिलचेअरवर भरतनाट्यम्‌, भगवद्‌गीता, मार्शल आर्टस्‌, आर्मी मॅन इन ॲक्‍शन आणि वंदे मातरम्‌ या सर्व कला सादर करण्यात आल्या. पुणे स्थित भारतीय लष्करी तुकडीच्या अर्धांगवायू केंद्रातील जवान व त्यांचे कुटुंबीय या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यात सीमेवरील युद्धादरम्यान अपंगत्व आलेल्या लष्करी जवानांच्या पुनर्वसनासाठी १० लाखांची रक्कम मदत स्वरूपात श्री षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर यांच्या हस्ते महाराष्ट्र, गुजरात व गोवा लेफ्टनंट जनरल विशंभर सिंह यांना सुपूर्द करण्यात आली.

Web Title: mumbai news soldiers Republic Day