सोनू निगमच्या जिवाला धोका?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई - प्रसिद्ध पार्श्‍वगायक सोनू निमगच्या जिवाला काही संघटनांकडून धोका असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर विभागाला मिळाली आहे. जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी ही माहिती कळवली आहे. त्याची गंभीर दखल घेत निगमला सुरक्षा पुरवण्याच्या सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अजान संदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर सोनूच्या विरोधात नाराजीचे सूर उमटले होते. धार्मिक भावना दुखावल्याने पश्‍चिम बंगालमधील संघटनेने त्याचे मुंडण करणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस घोषित केले होते. हे प्रकरण ताजे असताच काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी एका संशयिताला अटक केली होती. त्याच्या चौकशीत सोनूच्या जिवाला धोका असल्याची माहिती मिळाली. ही माहिती जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी महाराष्ट्र गुप्तवार्ता विभागाला कळवली आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाने संबंधित माहिती मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागाला कळवली आहे. सरकारी जागेत किंवा प्रमोशन कार्यक्रमाच्या वेळी त्याच्यावर हल्ला होऊ शकतो, अशा सूचना गुप्तवार्ता विभागाने केल्याचे समजते. याबाबत सोनू निगम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Web Title: mumbai news sonu nigam danger