आवाजाची पातळी १०० डेसिबलच्या पुढे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई - सात दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी मुंबईत ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढल्याची नोंद झाली आहे. बहुतांश ठिकाणी फटाक्‍यांचा आवाज चांगलाच गाजला. वरळीतील उड्डाणपुलावर आवाजाची पातळी सर्वात जास्त होती. अनेक ठिकाणी शंभर डेसिबलच्याही पुढे पातळी गेली.

ध्वनिप्रदूषणावर काम करणाऱ्या आवाज फाऊंडेशनतर्फे दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान आवाजाची पातळी मोजली जाते. सातव्या दिवसाच्या गणपतीचा निरोप घेताना बहुतांश ठिकाणी आवाजाची शंभर डेसिबलच्याही पुढे नोंद झाली. सांताक्रूझ पोलिस ठाण्यासमोर १००.९ डेसिबल, जुहू कोळीवाड्यात १०९.२ डेसिबल, शिवसेना भवनाजवळ ११०.७ डेसिबल आणि प्रभादेवीत १०६.८ डेसिबलइतक्या आवाजाची पातळी गाठली गेली. वरळी उड्डाणपुलावर १११.५ डेसिबलची पातळी गाठली गेली. काही मिरवणुकांत प्राण्यांचाही वापर झाला, अशी माहिती आवाज फाऊंडेशनच्या संस्थापिका सुमैरा अब्दुलली यांनी दिली.

Web Title: mumbai news sound level