उत्तरपत्रिका तपासणीचे मानधन अद्याप प्रलंबित 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

मुंबई - दहावीचे निकाल जाहीर झाले असले, तरी उत्तरपत्रिका तपासणीचे काम करणाऱ्या शिक्षकांना अद्याप मानधन मिळालेले नाही. परीक्षक व निरीक्षकांनाही मानधन मिळाले नसल्याची तक्रार टीचर्स डॅमोक्रेटिक फ्रंटचे (टीडीएफ) उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली आहे. 

ऑनलाइन यंत्रणा सुरू झाल्यापासून शिक्षकांचे मानधन वेळेवर मिळत नसल्याची तक्रार टीडीएफने केली आहे. शिक्षकांनी आपल्या बॅंक खात्याचा क्रमांक वारंवार देऊनही मानधन देण्यात विलंब होत असल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. उत्तरपत्रिका तपासणीचे काम एप्रिल आणि मेमध्ये झाले. जूनमध्ये निकाल लागला तरीही मंडळाकडून मानधनाबाबत काहीच कळवले गेले नाही. मानधनवाढीची मागणी करूनही केवळ 75 पैसे वाढवण्यात आल्याची खंत पांड्या यांनी व्यक्त केली.

Web Title: mumbai news ssc