दहावी पेपरफुटीप्रकरणी दोघांच्या कोठडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई  - दहावी पेपरफुटीप्रकरणी अटकेत असलेले मुझम्मिल इक्‍बाल काझी आणि फिरोज युसूफ अन्सारी यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने शनिवारपर्यंत (ता. 31) वाढ केली. पेपरफुटीत सहभागी असलेल्या आठ विद्यार्थ्यांची पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे सुटका केली. साकीनाका येथील काजूपाड्यातील एका शिक्षिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून इक्‍बाल आणि फिरोजला अटक केली होती. तपासाकरिता त्या दोघांना बुधवारी (ता. 28) साकी नाका पोलिस ताब्यात घेणार आहेत. फिरोज साकीनाका परिसरात खासगी शिकवणी घेतो; तर मीरा रोड येथील राहिवासी असणारा मुझम्मिल शिक्षक आहे. मुझम्मिलने सोशल मीडियावरून दहावीचा पेपर फिरोजला दिल्याचे तपासात उघड झाले होते.
Web Title: mumbai news ssc paper leakage case crime custody