एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात याचिका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

मुंबई - वेतनवाढीच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. 

मुंबई - वेतनवाढीच्या मागणीसाठी दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईसह राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमधील प्रवाशांचे हाल सुरू आहेत. ऐन दिवाळीत प्रवाशांना वेठीस धरणारा हा संप बेकायदेशीर ठरवण्यात यावा, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे. संपाची तीव्रता वाढल्यामुळे न्या. संदीप शिंदे यांच्या न्यायालयात बुधवारी या याचिकांवर तातडीने सुनावणी झाली. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींदरम्यान संप मिटवण्याबाबत बोलणी सुरू आहेत, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. संघटनांचे प्रतिनिधीही यावेळी हजर होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्या तरी दिवाळीमध्ये त्यांनी प्रवाशांना वेठीस धरणे गैर आहे, असे याचिकादारांच्या वतीने ऍड्‌. पूजा थोरात यांनी सांगितले. 

Web Title: mumbai news st bus strike