एसटी चालक-वाहक पदाची 2 जुलैला परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई - एसटी महामंडळात चालक-वाहकांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी 2 जुलैला लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

मुंबई - एसटी महामंडळात चालक-वाहकांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी 2 जुलैला लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.

पात्र उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र, बैठक क्रमांक व परीक्षा केंद्राबाबतचा तपशील ई-मेल किंवा एसएमएसच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे. चालक-वाहक पदांसह लिपिक, टंकलेखक व पर्यवेक्षकपदासाठी एसटी महामंडळाने जानेवारी महिन्यात जाहिरात दिली होती. त्यानंतर या पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले. या सर्वांची लेखी परीक्षा 2 जुलैला होईल. अन्य पदांसाठीच्या परीक्षेची तारीख लवकरच निश्‍चित करण्यात येईल. चालक-वाहक पदासाठीच्या लेखी परीक्षेचे पत्र त्यांनी दिलेल्या ई-मेलवर पाठवण्यात येईल. उमेदवारांनी आपला तात्पुरता संकेत क्रमांक वापरून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

Web Title: mumbai news st conductor driver post exam 2nd july

टॅग्स