वेतनवाढ अहवालाची होळी करणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भातील उच्चस्तरीय समितीने दिलेला अहवाल कर्मचारी संघटनेने अमान्य केला आहे. गुरुवारी (ता.25) राज्यभरातील आगारांमध्ये त्या अहवालाची होळी करणार असल्याचे संघटनेने सांगितले. त्यानंतरही राज्य सरकारकडून न्याय न मिळाल्यास 9 फेब्रुवारीला एसटी कर्मचारी सहकुटुंब आक्रोश मोर्चा काढणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. कृती समितीची शुक्रवारी (ता. 19) मुंबईत बैठक झाली. त्या वेळी उच्चस्तरीय समितीचा अहवाल निराशाजनक व संतापजनक आहे, असा आरोप करण्यात आला.
Web Title: mumbai news st employee payment increase issue