एसटी कामगारांचा संप अटळ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

मुंबई - एसटी कामगारांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेण्यांसह सातवा वेतन आयोग लागू करावा, सातवा वेतन आयोग लागू होईपर्यंत एक एप्रिल 2016 पासून 25 टक्‍के अंतरिम वाढ द्यावी, अशा अनेक मागण्यांसाठी मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून संपाची तयारी सुरू आहे. त्यासाठी दोन दिवस राज्यभर एसटी कामगारांचे मतदान घेण्यात आले. यामध्ये 90 हजार 500 पेक्षाही अधिक कामगारांनी मतदान केले असून, त्यातील 98 टक्‍के कामगारांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे संप अटळ असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
Web Title: mumbai news ST workers strike are unavailable?