भटक्‍या कुत्र्यांसाठी पॅथालॉजी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - भटक्‍या कुत्र्यांवरील उपचाराबाबत अद्याप फारसे गांभीर्याने घेतले जात नसताना मुलुंडमधील सामाजिक संस्थेने भटक्‍या कुत्र्यांकरिता पॅथालॉजी लॅब सुरू केली आहे. 24 तास सुरू राहणाऱ्या या केंद्रात कुत्र्यांची मोफत रक्ततपसाणी केली जाणार आहे. हा देशातील पहिलाच प्रयोग आहे, असा दावा संस्थेने केला आहे. 

मुलुंड पश्‍चिमेतील "उत्कर्ष स्टार मित्र मंडळ' या सामाजिक संस्थेच्या प्राणी कल्याण विभागाने भटक्‍या कुत्र्यांसाठी पॅथॉलॉजी लॅब सुरू केली आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते रविवारी या लॅबचे उद्‌घाटन झाले. या वेळी आमदार सरदार तारासिंग, आमदार अशोक पाटील आदी उपस्थित होते. दीडशे चौरस फूट जागेत हे केंद्र उभारण्यात आले आहे. भटक्‍या कुत्र्यांमधील रक्ततपासणीतून मूत्राशय आणि यकृताशी संबंधित अवयवांमधील आजारांचे निदान करण्याकरिता "ऑटोमेटिक सेल्फ काऊंटर' आणि संसर्गाचे निदान करण्याकरिता "अरबा कॅम्प 7' या दोन अद्ययावत मशीन पॅथॉलॉजी केंद्रात ठेवण्यात आल्या आहेत. या दोन्ही मशीनसाठी सुमारे 22 लाख खर्च करण्यात आले. 

भटक्‍या कुत्र्यांना माया सोडाच; पण उपचारांसाठीही कोणी पुढे येत नाही, अशी खंत या वेळी गीते यांनी व्यक्त केली. भटक्‍या कुत्र्यांचा प्रश्‍न केवळ सरकारचा नाहीये. त्यासाठी समाजाचे सहकार्य आवश्‍यक आहे, असेही ते म्हणाले. 

भटक्‍या कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेदरम्यान पालिकेसोबत काम करताना कुत्र्यांच्या आरोग्याची समस्या लक्षात आली. महिन्यातून दोन कुत्री आजाराचे निदान न झाल्यामुळे दगावतात. भटक्‍या कुत्र्यांवरील उपचारासाठी त्यांची रक्ततपासणी आवश्‍यक आहे. पॅथॉलॉजी केंद्रात मुंबईतील भटक्‍या कुत्र्यांसाठी मोफत सुविधा दिली जाईल. 
- ऍड्‌. दगडू लोंढे, सचिव, उत्कर्ष स्टार मित्र मंडळ. 

Web Title: mumbai news street dog