प्रवेशाच्या नावाखाली 10 विद्यार्थ्यांची 50 लाखांची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - विलेपार्ले येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा घालणाऱ्या मेहफुज जकी अहमद शेख याला अखेर जुहू पोलिसांनी अटक केली. त्याने आतापर्यंत 10 जणांची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

प्रसिद्ध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक असतात; पण त्यांना प्रवेश मिळतोच असे नाही. याचाच गैरफायदा घेऊन शेख विद्यार्थ्यांशी संपर्क साधत असे. आपण या महाविद्यालयाच्या शिक्षण संस्थेचा पदाधिकारी असल्याचे सांगून तो विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आमिष दाखत असे. प्रवेशासाठी तो पाच लाख रुपयांची मागणी करीत असे. अशाप्रकारे शेखने अनेकांना फसवले. त्याने 10 विद्यार्थ्यांना पाच ते सहा लाख रुपयांना फसवल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला पैसे दिलेल्या एकाही विद्यार्थ्याला प्रवेश मिळाला नाही. एका विद्यार्थ्याने जुहू पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी शेखला अटक केली. त्याच्याविरोधात जुहू पोलिस ठाण्यात फसवणूक आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: mumbai news student Cheating