'विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळेच समाजात बदल घडेल'

'विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळेच समाजात बदल घडेल'

मुंबई - ‘हेबिटेट फॉर ह्युमॅनिटी इंडिया’च्या ‘रूपी फॉर चेंज’ उपक्रमात शालेय विद्यार्थी सहभाग घेतात, हे कौतुकास्पद आहे. या उपक्रमासाठी योगदान देण्यासह त्यांना सामाजिक विकासासाठी एकत्र काम करण्याचे धडेही मिळतात. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या प्रत्येक रुपयामुळे समाजात बदल घडण्यास मदत मिळेल, असे प्रतिपादन अभिनेता जॉन अब्राहम याने येथे केले.

रूपी फॉर चेंज उपक्रमात योगदान दिलेल्या शाळा, विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये शनिवारी (ता. ४) विशेष कार्यक्रम झाला. यात जॉन बोलत होता. या वेळी जॉनच्या हस्ते या उपक्रमात योगदान दिलेल्या हैदराबाद, नागपूर, कल्याण, बठिंडा येथील चार शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. हेबिटेट इंडियाने २०१६-१७ या वर्षात देशभरात ७२७ घरांची व ७ हजार ९९७ स्वच्छतागृहांची बांधणी व दुरुस्ती केली. यासाठी देशातील ३०० हून अधिक शाळांतील ३५ हजार विद्यार्थ्यांच्या मदतीने निधी उभारण्यात आला.

रूपी फॉर चेंज अभियानाने गरीबांसाठी घरे व स्वच्छता या विषयावर आधारित टी शर्ट डिझाईनची स्पर्धा घेतली होती. यात ठाण्यातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील सत्यम सुबोधी आणि नेरूळमधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील सम्यक झा या दोन मुलांनी तयार केलेल्या डिझाईनचा टी शर्ट जॉन अब्राहमने कार्यक्रमात घातला होता. या वेळी त्याने विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com