विद्यार्थी देणार प्लास्टिकमुक्तीचा नारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मुंबई - प्लास्टिक वापरामुळे निसर्गाच्या चक्रावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे ठाण्याच्या होली क्रॉस कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्तीचा नारा दिला आहे. वापर कमीत कमी करून इतरांनाही प्लास्टिक वापरापासून परावृत्त करू, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. ‘सकाळ’ने हाती घेतलेल्या प्लास्टिकविरोधी मोहिमेला संपूर्ण सहकार्यही विद्यार्थी करणार असल्याचे इको रॉक्‍सच्या रश्‍मी जोशी यांनी सांगितले.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे प्लास्टिकविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. शाळा तसेच महाविद्यालयांमध्येही प्लास्टिकविरोधी मोहीम राबवण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी प्लास्टिक जमा करणार आहेत. इको रॉक्‍सतर्फे संकलन केलेल्या प्लास्टिकचे रिसायकलिंग करण्यात येणार आहे. 

ठाण्यातील होली क्रॉस शाळेतील तब्बल ५०० विद्यार्थ्यांसमोर रश्‍मी जोशी यांनी प्लास्टिकबंदी का करावी, त्याचा वापर कमी का करावा, हे दाखवणारे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी वापरलेल्या पेनांपासून ते विविध शालेय साहित्य आणि दैनंदिन वस्तूंपर्यंत प्लास्टिकचा कचरा स्वतंत्र ठेवण्याचे वचन दिले. कचऱ्याचा पुनर्वापर होईल आणि पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल, असा निर्धार त्यांनी या वेळी केला.

Web Title: mumbai news student plastic