विद्यार्थ्यांनी अनुभवले भारताच्या नौदलाचे सामर्थ्य 

दिनेश चिलप मराठे
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

आयएनएस म्हैसूरबाबत परमेश्वर, शुभम आणि हर्षद या कॅडेट्सनी अन्य लढाऊ नौकांसोबत माहिती संवाद साधण्यासाठी दळणवळण सिस्टमची माहिती देत होते. महेश भोसले, विशाल गुप्ता, गिरीश तावरे, तनिष्क कांबळे, मयूर आढाव यांनी
आयएनएस कलवरी स्कार्पियो सबमरीन (पाणबुडी), आयएनएस विक्रमादित्य, कोस्ट गार्ड, आयएनएस म्हैसूर, आयएनएस मुंबई, आयएनएस विराट यांच्या शौर्याची गाथा सांगताच सर्वांना स्फुरण चढले.

मुंबादेवी : 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात आपल्या नौदलाने शौर्य गाजविले होते. थल सेना आणि वायु सेना यांनीही अतुलनीय पराक्रम करीत पाकिस्तानला चारी मुंडया चीत करीत पराभवाचा कडु घास भरविला होता.

आपल्या शुर सैन्यांनी केलेला पराक्रम आज विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष विविध लढाऊ जहाजांच्या (मॉडल्स) प्रतिकृतीतुन दर्शविला जात होता. त्या वेळी शौर्य गाजविणारी आयएनएस 'विक्रांत' विद्यार्थ्यांनी पाहिली आणि सैन्याच्या पराक्रमाचे वर्णन कॅडेट वैष्णवी बोरले, पूजा पवार यांनी सांगताच सर्वाच्या अंगावर रोमांच उठले आणि जवानांच्या प्रती आपली आस्था जागविण्यासाठी सर्वानी जय हिंद असा जयघोष केला. त्याच वेळी या पार्श्वभूमीवर सारे जहाँसे अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा अशी धुन ध्वनिक्षेपावरून वाजत होती. सिद्धार्थ कॉलेजचे उप प्राचार्य लेफ्टनंट कमांडर डॉ. सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली NCC यूनिट सिद्धार्थ डीटाचमेंट चे कॅडेटस् प्रदर्शनात विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करीत होते.

आयएनएस म्हैसूरबाबत परमेश्वर, शुभम आणि हर्षद या कॅडेट्सनी अन्य लढाऊ नौकांसोबत माहिती संवाद साधण्यासाठी दळणवळण सिस्टमची माहिती देत होते. महेश भोसले, विशाल गुप्ता, गिरीश तावरे, तनिष्क कांबळे, मयूर आढाव यांनी
आयएनएस कलवरी स्कार्पियो सबमरीन (पाणबुडी), आयएनएस विक्रमादित्य, कोस्ट गार्ड, आयएनएस म्हैसूर, आयएनएस मुंबई, आयएनएस विराट यांच्या शौर्याची गाथा सांगताच सर्वांना स्फुरण चढले.

श्रीराम फाउंडेशन डोंगरी यांच्या सहकार्याने सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये 'गार्डियन्स ऑफ़ द सी' हे नौदलाच्या लढाऊ नोकांचे प्रदर्शन सिद्धार्थ कॉलेज नेव्हल युनिट, माझगाव डॉक यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास मुंबईतुन 16 शाळांच्या जवळपास 1800  विद्यार्थी आणि त्यांचे पालक मित्र परिवार मिळून भेट दिली. सकाळी 8 वाजता सुरु झालेले प्रदर्शन रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. ते विद्यार्थ्यांनी रविवारची ख़ास सुट्टी भेट देत एन्जॉय केली. या प्रदर्शनाचे उद्घाटन कैप्टन सतीश शेनॉय यांच्या शुभ हस्ते झाले.

शालेय विद्यार्थीनी हिने प्रदर्शन पाहुन म्हटले की शालेय जीवनात आम्हा विद्यार्थ्याना आज हे नौदलाचे सामर्थ्य पाहुन फार आनंद वाटला.प्रत्यक्ष लढाऊ नौका पाहून भविष्यात NDA, IMA ज्वाइन करुन एक लढाऊ सैनिक म्हणून देशसेवा करण्याची उर्मी आमच्या मनात निर्माण झाली. श्रीराम फाउंडेशन (डोंगरी) तर्फे या नौदल शौर्य सामर्थ्य प्रदर्शन आयोजीत करण्यात सचिन मयेकर, अभिषेक सुर्वे,मयूर करंजावकर,सचिन जाधव,राजेश माळी, चेतन जगनाडे,नितिन मयेकर विशेष सहकार्य आमदार आशीष शेलार यांनी केले.

Web Title: Mumbai news students visit Navy officers