विधानभवनात क्रिकेटपटू सुनील गावसकरांचे आगमण

तुषार खरात
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई : अधिवेशनामुळे विधानभवनात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. छोट्या कार्यकर्त्यांपासून ते मोठ्या पुढा-यांपर्यंत राजकारण्यांची विधीमंडळात सतत गर्दी असते. पण आज (बुधवार) अचानक प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी विधानभवनात एंट्री घेतली, अन् सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

गावसकर आले ते थेट परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या दालनात गेले. नंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. वाहनांचे वाढते अपघात व वाहनांमुळे होणारे ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी गावसकर यांनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. गावसकर यांनी एका प्रदर्शनीय क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. महेंद्रसिंग धोणी, शिखर धवन, सुरेश रैना यांसारखे रथी महारथी खेळाडू या सामन्यात खेळणार आहेत.

'नो हाँर्न प्लीज' आणि 'रस्ते सुरक्षा अभियान' असे दोन संघ तयार केले जाणार आहेत. या दोन्ही संघात येत्या २४ मार्च रोजी लढत होणार आहे. या क्रिकेट सामन्याचे निमंत्रण फडणवीस व रावते यांना देण्यासाठी गावसकर विधानभवनात आले होते, असे सूत्रांनी 'ई सकाळ'शी बोलताना सांगितले.

Web Title: mumbai news sunil gavaskar in vidhan bhavan