स्वाभिमानी पक्ष 'रालोआ'तून बाहेर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि "रालोआ'तून (एनडीए) बाहेर पडत असल्याबाबतचे पत्र त्यांना दिले.

मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि "रालोआ'तून (एनडीए) बाहेर पडत असल्याबाबतचे पत्र त्यांना दिले.

भाजप सरकारला पाठिंबा दिला होता, ही आपली चूक झाली. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे आपण भाजपसह रालोआतून बाहेर पडत आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस या वेळी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर सरकारने सातत्याने चर्चेची भूमिका घेतली आहे आणि प्रत्येक घटकाशी सरकारने वेळोवेळी चर्चासुद्धा केली आहे. खासदार शेट्टी यांच्यासोबतसुद्धा शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याची तयारी आहे. या वेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर हेसुद्धा उपस्थित होते. त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा या वेळी मुख्यमंत्र्यांना दिला. तुपकर यांच्या राजीनाम्यावर योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले.

Web Title: mumbai news swabhimani shetkari sanghatana out in NDA