मुंबईत स्वाईन फ्लू डोके वर काढतोय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

15 दिवसांत 107 रुग्णांची नोंद; तिघे दगावले
मुंबई - मुंबईत दिवसेंदिवस स्वाईन फ्लू डोके वर काढत असून, जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तब्बल 107 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत मुंबईत स्वाईन फ्लूचे 177 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा डॉक्‍टर देत आहेत.

अंधेरीतील गुंदवली हिल परिसरात राहणाऱ्या 63 वर्षांच्या व्यक्तीचे मागील बुधवारी (ता. 7) पालिका रुग्णालयात निधन झाले. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ते देवगड-सिंधुदुर्ग येथे फिरावयास गेले होते.

जोगेश्‍वरीतील 74 वर्षांच्या एका व्यक्तीचाही स्वाईन फ्लूमुळे मंगळवारी (ता. 13) मृत्यू झाला. त्याच दिवशी मुंबईतील एका पालिका रुग्णालयात अंधेरीतील 75 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. या तिघांना अन्य आजारही होते.

या तिघांच्या मृत्यूनंतर मुंबईत काही दिवसांत स्वाईन फ्लूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सातवर पोचली आहे. यापूर्वी स्वाईन फ्लूमुळे निधन झालेले चौघे उपचारांसाठी मुंबईत आले होते. दरम्यान, राज्यात जानेवारीपासून 240 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे.

मुंबईत साथींच्या अन्य आजारांचे रुग्णही वाढत आहेत. त्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

आजार जून 2017 जून 2016
मलेरिया - 166 482
डेंगी - 14 48
लेप्टो - 06 10
गॅस्ट्रो - 436 979
स्वाईन फ्लू - 107 0

Web Title: mumbai news swine flu in mumbai