वातावरणातील बदलांमुळे स्वाइन फ्लूचा प्रसार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबई - वातावरणातील बदलांमुळे मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे; मात्र त्यावर तज्ज्ञच संशोधन करून ठोस निष्कर्ष काढतील, असे मुंबई पालिकेच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

मुंबईत जून महिन्यात स्वाइन फ्लूचे 313 रुग्ण सापडले. सर्वसाधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर आणि फेब्रुवारी-मार्चदरम्यान स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढते. यंदा जूनमध्ये या रुग्णांची संख्या वाढल्याने राष्ट्रीय संसर्गजन्य आजार केंद्राच्या पथकाने काही दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे तसेच पुण्यात तपासणी केली होती. मुंबईत जानेवारीपासून जूनअखेरपर्यंत स्वाइन फ्लूचे 490 रुग्ण रुग्णालयांत दाखल झाले. त्यापैकी 313 रुग्ण जून महिन्यातील होते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू पसरण्याचा ट्रेंड बदलला असल्याची शक्‍यता आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास रुग्णावर तातडीने उपचार सुरू करा. चाचण्यांचा अहवाल येण्याची प्रतीक्षा करू नका, असा सल्ला राष्ट्रीय संसर्गजन्य आजार केंद्राच्या पथकाने दिला आहे.

Web Title: mumbai news swine flu spread by environment changes