तळोजा 'MIDC'मधील कारखान्याविरोधात ग्रामस्थ उपोषण करणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

कारखाना सुरू होऊनही ग्रामस्थांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने शेतकरी कामगार पक्षाने ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील 'असाही इंडिया' या कारखान्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कारखाना प्रशासन स्थानिकांनवर अन्याय करत असल्याचा आरोप शेतकरी कामगार पंक्षाने केला असून प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात खैरणे गाव शेतकरी कामगार पक्षाकडून शुक्रवारपासून (ता. 17) आमरण उपोषण सुरू केलं जाणार असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

गेल्या चार वर्षांपासून बंद असलेला असाही इंडिया हा कारखाना पुन्हा सुरू झाला अाहे. पुन्हा सुरू करतेवेळी कारखाना प्रशासनातर्फे ग्रामस्थांना वेगवेगळी अाश्वासने दिली गेली होती. मात्र, कारखाना सुरू होऊनही ग्रामस्थांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने शेतकरी कामगार पक्षाने ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीही असाही इंडिया कंपनी बंद करतेवेळी बाहेर काढण्यात आलेल्या जुन्या कामगारांनी पुन्हा कामावर घेण्याकरता भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं. कारखाना प्रशासनाविरोधात कामगारांचा प्रश्नही न्यायप्रविष्ट आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news taloja midc factory agitation fasting