'टाटा फायनान्स'चे माजी एमडी दिलीप पेंडसे यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई - 'टाटा फायनान्स'चे माजी व्यवस्थापकीय संचालक (एमडी) दिलीप सुधाकर पेंडसे (61) यांनी मुंबईत दादर पूर्व येथील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून त्यात जीवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे पेंडसे यांनी लिहिले होते.

दादर पूर्व येथील स्वामी नारायण मंदिराजवळील "रॉयल ग्रेस' या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पेंडसे यांचे घर आहे, तर तळ मजल्यावर त्यांचे कार्यालय. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कार्यालयात गेले. तेथे दुपारी अडीच वाजले तरी पेंडसे घरी जेवण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय पाहण्यासाठी गेले असता त्यांनी कार्यालयातील पंख्याला लटकून गळफास घेतला होता.

पेंडसे व्यवस्थापकीय संचालक असताना टाटा फायनान्स तोट्यात गेल्याने टाटा समूहाने 2002 मध्ये त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्याविरुद्ध तक्रारही केली होती. आपल्यावरील आरोप फेटाळणाऱ्या पेंडसे यांना या दरम्यान काही काळ तुरुंगातही राहावे लागले. 2002 मध्ये तक्रारीनंतर सेबीने पेंडसेना एप्रिल 2009 मध्ये नोटीस पाठविली व डिसेंबर 2012 मध्ये आदेश जारी केला. त्याला पेंडसेंनी लवादात आव्हान दिले. लवादाच्या निर्देशानंतर सेबीने पेंडसे यांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली. त्यानंतर तक्रारीत तथ्य आढळल्याचे कारण देत दोषी ठरविले होते.

Web Title: mumbai news tata finance ex. md dilip pendase suicide