क्षयरुग्णांच्या संख्येत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

तुर्भे  -संसर्गजन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षयरोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. नवी मुंबईत पाच वर्षांत क्षयरुग्णांच्या संख्येत 6.3 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी शहरात एक हजार 795 रुग्ण होते. आता त्यांची संख्या एक हजार 909 झाली असल्याचे पालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद केले आहे. तुर्भे परिसरात क्षयाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात दर वर्षी या आजाराने तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होतो. 

नवी मुंबई महापालिका हद्दीत पाच वर्षांत क्षयरुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पर्यावरण स्थिती अहवालात म्हटले आहे. त्याला आळा घालण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. क्षयरोगाचा नायनाट करण्याच्या दृष्टीने त्याचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने आठवड्यातून तीन वेळा देण्यात येणाऱ्या उपचारांऐवजी प्रत्यक्ष निरीक्षण करून दैनंदिन उपचारांवर भर दिला आहे. महापालिकेशी संलग्न रुग्णालये, बिनसरकारी संस्था, आरोग्य केंद्र येथे उपचाराची सेवा सुरू केली आहे. सध्या शहरात पालिकेच्या वतीने क्षयरुग्णांचे सर्वेक्षण केले जात आहे. तुर्भे परिसरातील दगडखाण परिसरातील वस्त्यांमध्ये क्षयरुग्णांची संख्या जास्त असल्याचे आढळले आहे. येथील अनेकांना पुन्हा क्षय झाल्याचे पाहणीत आढळले आहे. 

वर्ष रुग्णांची संख्या 
2015 1797 
2016 1909 

शहरात क्षयरोगाबाबत सर्वेक्षण सुरू आहे. पालिकेच्या वतीने योग्य उपाययोजना केली आहे. पालिका रुग्णालयांत मोफत औषधोपचार केले जात आहेत. 
- डॉ. दीपक परोपकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी 

Web Title: mumbai news TB