शिक्षक भरतीमधील गैरप्रकार थांबणार

शिक्षक भरतीमधील गैरप्रकार थांबणार

मुंबई - राज्यातील विनाअनुदानित व अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांतील शिक्षक भरतीसाठी केंद्रीय पद्धतीने अभियोग्यता चाचणी (ऍप्टिट्यूड टेस्ट) घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

खासगी व सरकारी अनुदानित शाळांमध्ये संस्थाचालकांमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीतील गैरप्रकार वाढत चालले असून, या प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली होती. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत सूचना दिल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या वतीने अनुदान मिळते, अशा सर्व शाळांतील शिक्षकांची भरती केंद्रीय परीक्षेद्वारे करण्यात येईल. या पद्धतीत उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. शिवाय शिक्षकांच्या गुणवत्तेच्या आधारे पारदर्शी पद्धतीने ही भरती होईल. या प्रक्रियेसाठी संकेतस्थळ असेल. शिक्षकांच्या रिक्त जागा या संकेतस्थळावर पाहता येतील. या जागांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतील.

या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्ताधारक शिक्षक मिळतील. त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होऊ शकेल. तसेच भरतीमधील गैरप्रकार बंद होतील.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com