कंत्राटी शिक्षकांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

तुर्भे - ठोक मानधनावरील प्राथमिक शिक्षकांनी त्यांची वैयक्तिक माहिती ऑनलाईन द्यावी, अशी सूचना नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळाने केली आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यात थकीत पगाराचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. पालिका शाळेतील शिक्षक आठ महिन्यांपासून बिनपगारी काम करत असल्याची बातमी ‘सकाळ’ने सोमवारी (ता. १४) दिली होती. त्यानंतर पालिकेने याबाबतचे पत्रक काढले आहे. आठ महिन्यांपासून प्राथमिक शिक्षक विनावेतन ज्ञानदानाचे काम करत आहेत. याबाबत शिक्षकांनी पालिका आयुक्ताची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सहा महिन्यांपूर्वी दिले होते.

तुर्भे - ठोक मानधनावरील प्राथमिक शिक्षकांनी त्यांची वैयक्तिक माहिती ऑनलाईन द्यावी, अशी सूचना नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण मंडळाने केली आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यात थकीत पगाराचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. पालिका शाळेतील शिक्षक आठ महिन्यांपासून बिनपगारी काम करत असल्याची बातमी ‘सकाळ’ने सोमवारी (ता. १४) दिली होती. त्यानंतर पालिकेने याबाबतचे पत्रक काढले आहे. आठ महिन्यांपासून प्राथमिक शिक्षक विनावेतन ज्ञानदानाचे काम करत आहेत. याबाबत शिक्षकांनी पालिका आयुक्ताची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सहा महिन्यांपूर्वी दिले होते. शिक्षण अधिकारी संदीप संगवे यांनाही निवेदन दिले होते; परंतु त्यानंतरही या ना त्या कारणाने शिक्षकाचे वेतन लांबणीवर पडत होते. 

समायोजित शिक्षक घेणार असल्याचे पालिकेने न्यायालयात सांगितले होते; परंतु ते घेतले नसल्याने विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना थकीत वेतन देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतरही पालिकेने या शिक्षकांना पगार दिला नव्हता. परंतु आता शिक्षण मंडळाने पत्र काढून प्राथमिक शिक्षकांनी पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक खाते पासबुकाची छायांकित प्रत शिक्षण मंडळाकडे सादर करावी, असे सांगितले आहे. त्यामुळे या शिक्षकांना पगार मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

Web Title: mumbai news teacher