सात हजार शिक्षकांच्या पगाराचा मार्ग मोकळा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मुंबई -- शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षण निरीक्षक कार्यालयात बुधवारी "शिक्षक भारती'ने आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राज्यातील तब्बल सात हजार शिक्षकांना पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुंबई -- शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याच्या निर्णयाविरोधात शिक्षण निरीक्षक कार्यालयात बुधवारी "शिक्षक भारती'ने आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर राज्यातील तब्बल सात हजार शिक्षकांना पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

2 मे 2012 नंतर मान्यता मिळालेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षण आयुक्तांनी 24 ऑगस्टला मान्यता रद्द करण्याचे पत्र मागे घेतले होते; परंतु शिक्षण उपसंचालक कार्यवाही करत नव्हते. याविरोधात बुधवारी "शिक्षक भारती'ने आंदोलन केले. त्यानंतर शिक्षकांच्या नेमणुका रद्द करण्याचे पत्र मागे घेऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेचे लाभ द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील 1 हजार 300 आणि राज्यातील सात हजार शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. मान्यता मिळालेल्या शिक्षकांच्या नेमणुका बेकायदा ठरवल्यानंतर शिक्षक भारतीने न्यायालयात धाव घेतली होती. सर्व शिक्षकांना सरकारने त्वरित वेतन व अन्य लाभ सुरू करावेत, त्यांच्या सेवा पूर्ववत कराव्यात, असे आदेश न्यायालयाने दिले होते. आता शिक्षण निरीक्षकांनी त्वरित सेवासमाप्तीचे आदेश मागे घेऊन शिक्षकांचे पगार विनाविलंब द्यावेत, अशी मागणी शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी केली. 

Web Title: mumbai news teacher