विनाअनुदानित शिक्षक 14 पासून संपावर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मुंबई - राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्न धसास लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली 14 नोव्हेंबरपासून शिक्षक बेमुदत संप पुकारणार आहेत. 

मुंबई - राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्न धसास लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली 14 नोव्हेंबरपासून शिक्षक बेमुदत संप पुकारणार आहेत. 

शिक्षक - मुख्याध्यापक संघटनेच्या शुक्रवारी (ता. 10) बोरिवली येथे झालेल्या बैठकीत बेमुदत संप करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि शिक्षकांच्या मनस्तापाला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी या बैठकीत करण्यात आली. विनाअनुदानित शाळा 17 वर्षांपासून अनुदानाची मागणी करत आहेत. दोन टक्के अनुदान घेणाऱ्या 1628 शाळांना नियमानुसार अनुदान देण्यात यावे, शिक्षकांना संरक्षण द्यावे, आंदोलक शिक्षकांवरील सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. 

Web Title: mumbai news teacher strike school