शिक्षिका, ट्रस्टीची जामिनावर सुटका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

मुंबई  - तीन वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले अंधेरीतील शाळेचे ट्रस्टी आणि शिक्षिकेची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात डिसेंबर अखेर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.

अंधेरीतील एका नर्सरीमध्ये शिकणाऱ्या एका बालिकेला एका शिक्षिकेने ट्रस्टीच्या कॅबिनमध्ये नेल्याचा आरोप आहे. त्याने कॅबिनमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा तिच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. मुलीच्या स्वभावात बदल झाला, ती शाळेत जाण्यास घाबरू लागल्यावर नातेवाइकांनी तिची चौकशी केली. तेव्हा तिने घडल्या प्रकाराची माहिती नातेवाइकांना दिली. नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तपासाला सुरवात केली. शाळेतल्या कर्मचाऱ्यांसह 75 जणांचे जबाब नोंदवले होते.

या प्रकरणी पोलिसांनी शाळेच्या ट्रस्टीला आणि शिक्षिकेला अटक केली होती.

Web Title: mumbai news teacher trusty release on bell