"तेजस'मध्ये लवकरच "रेल सुंदरी'कडून स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई - कोकण रेल्वेच्या आरामदायी "तेजस' ट्रेनमध्ये लवकरच प्रवाशांचे स्वागत करताना "रेल्वे सुंदरी' दिसणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी "गतिमान एक्‍स्प्रेस'मध्ये हा पॅटर्न राबवला आहे. आता हा उपक्रम मुंबई ते करमाळीदरम्यान धावणाऱ्या "तेजस एक्‍सप्रेस'मध्ये सुरू होणार आहे. 

आग्रा ते दिल्ली मार्गावर "गतिमान एक्‍स्प्रेस' धावते. भारतीय रेल्वे केटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) हाती घेतलेल्या खानपान सेवेच्या धर्तीवर गतिमान एक्‍स्प्रेसमध्ये "रेल्वे सुंदरी' नेमल्या आहेत. आता "तेजस' ट्रेनमध्येही "रेल्वे सुंदरी' नेमण्याचे नियोजन केले जात आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संबंधित विभागांना याबाबत सूचना केल्या आहेत. "तेजस' आठवड्यातून पाच आणि पावसाळ्यात आठवड्यातून तीन दिवस धावते. या अत्याधुनिक ट्रेनमध्ये सीसीटीव्ही, एलईडी स्क्रीन, कॉफी-चहाचे व्हेंडिंग मशीन इत्यादी सुविधा आहेत. 

Web Title: mumbai news tejas train