तापमान वाढीने उकाडा वाढला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

मुंबई -कमाल तापमानाने तिशी पार केल्याने मुंबईत मंगळवारी (ता. 30) दुपारी उकाडा वाढला. बुधवारी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसवर पोहोचेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. 

जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात तापमानात वाढ होईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार सोमवारपासून तापमान वाढत असल्याचे आढळले. सोमवारी 33 अंशावर असलेले कमाल तापमान मंगळवारी 34.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले. बुधवारी मुंबईचे तापमान 31 अंश सेल्सिअस असेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. 

Web Title: mumbai news temperature