दोन अंशांनी तापमान वाढणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

मुंबई - आठवडाभर थंडीचा आनंद लुटल्यानंतर आठवडाभरात तापमानात वाढ होण्याची शक्‍यता आहे. मंगळवारपर्यंत कमाल तापमान 32 अंशांवर, तर किमान 17 अंशांवर जाईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे जानेवारीच्या अखेरीस थंडी गायब होण्याची शक्‍यता आहे. 

दोन दिवसांत कमाल आणि किमान पारा दोन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. मुंबईसह किनारपट्टीवरील भागांत किमान पारा सरासरीच्या एक ते दोन अंशांनी कमी झाला आहे. उत्तरेकडील थंडी तसेच पश्‍चिमेकडून वाहणारे वारे यामुळे तापमान घसरल्याचा निष्कर्ष मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला होता. काही दिवसांत कमाल तापमान 30 अंशांच्या पुढे जाण्याची शक्‍यता आहे. सोमवारी कमाल पारा 31 तर मंगळवारी 32 अंशांपर्यंत येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: mumbai news temperature winter