अंबाडीत लुटारूंनी हवेत गोळीबार करुन व्यापारयाला लुटले

दीपक हिरे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

दुकान बंद करून ते दुकानातील सुमारे 1 लाखाची रोकड़ पिशवीत घेऊन मोटार सायकलने घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या पालतिवर असलेल्या लुटारूंनी पाठलाग करून वारेट येथील गतिरोधकावर गाठले.

वज्रेश्वरी : भिवंड़ी-वाडा रोडवरील वारेट येथे अदण्यात लुटारूनी एका दुकान व्यापारयाला फायटर पंचने मारहाण व हवेत गोळीबार करून सुमारे एक लाख रूपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना रविवारी रात्री पाऊणे दहा वाजन्याच्या सुमारास घडली आहे.

मोनिष जाधव (रा. वारेट) असे लुटण्यात आलेल्या दुकान व्यापारयाचे नाव आहे. मोनिष यांचा अंबाडी नाका येथे पूजा ट्रेडर्स नावाचे होलसेल व रिटेल सामान विक्रिचे दुकान आहे. सदर दुकान बंद करून ते दुकानातील सुमारे 1 लाखाची रोकड़ पिशवीत घेऊन मोटार सायकलने घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या पालतिवर असलेल्या लुटारूंनी पाठलाग करून वारेट येथील गतिरोधकावर गाठले व मोटार सायकल आडवी घालून पैशांची पिशवी हिसकावली यावेळी मोनिष याने प्रतिकार केला असता लुटारूंनी फायटर पंचने उजव्या डोळ्याच्या भुवईवर ठोसा मारून ज़खमी केले.

यावेळी जीवाच्या आकांताने मोनिष याने जवलच्या ओम साई धाब्याकड़े धाव घेतली असता लुटारूंनी पाठलाग करून हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून ढाबा मालक संजय भोईर हेही जिवाच्या भीतीने पळून त्यांनी जीव वाचवला अशाच प्रकारची घटना यापूर्वी या ठिकाणी घडलेली असून वाईन शॉप मालकावर गोळीबार करून लूटन्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती मात्र या घटनेतील दरोडेख़ोराना पकडन्यात गणेशपूरी पोलिसाना अद्यापही यश आलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news thane crime firing robbery

टॅग्स