संततधार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

आत्पकालीन परिस्थितीत नागरिकांनी टोल फ्री 1800222108, दूरध्वनी क्रमांक 25371010, 25399828, 25374578 ते 82, 25399617 आणि 25392323 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

ठाणे : गेल्या दोन दिवसापासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढ़च्या 48 तासातही अतिवृष्टीचा इशारा वर्तविण्यात आला आहे. ठाणे शहरातील सखळ भागात पाणी साठले असून, महापालिकेची आत्पकालीन यंत्रणा 24 तास कार्यरत आहे.

आत्पकालीन परिस्थितीत नागरिकांनी टोल फ्री 1800222108, दूरध्वनी क्रमांक 25371010, 25399828, 25374578 ते 82, 25399617 आणि 25392323 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

तरीही नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी अत्यंत महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणेकर नागरिकांना केले आहे.

Web Title: mumbai news thane rains alert helpline numbers