Mumbai News : मुंबईकरांचा सर्वात मोठा प्रश्न सुटणार; आता गाडीत बसूनच बुक करा पार्किंगची जागा

Mumbai Parking
Mumbai Parking sakal

मुंबई : मुंबईत आता पार्किंगसाठी ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार असून एकाच ॲपवर ऑनलाईन पेमेंटची सुविधाही दिली जाईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

Mumbai Parking
Deepak Kesarkar : इंग्रजीच्या अट्टाहासातून बाहेर पडा; शालेय शिक्षणमंत्री असं का म्हणाले?

मुंबईत कुठेही गाडी पार्किंगसाठी मोबाईलवर बुकिंग करणे शक्य होणार आहे. मोबाईलवरून पेमेंटही करता येणार आहे. त्यामुळे मुंबईत वाहन पार्किंगचे टेन्शन राहणार नाही. वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग यामुळे मुंबईत पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Mumbai Parking
Phakaat Trailer: LOC ची फाईल लागणार पाकिस्तानच्या हाती..? शहीद जवानांची बाजू मांडणारा 'फकाट'

वाहन पार्क करण्यासाठी जागा मिळत नसल्याने मुंबईत कुठेही वाहने पार्क केली जातात. त्यामुळे पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी हे मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार आहे. वाहनधारक मुंबईत कुठल्याही ठिकाणी वाहन पार्किंगची जागा बुक करू शकतील. मुंबई महापालिकेची वाहन स्थळे, एमएमआरडीए, मुंबई पोर्ट ट्रस्ट, खासगी गृहनिर्माण सोसायटी, सरकारी व निमसरकारी संस्थेकडे असलेल्या जागेत विशेष वेळेत पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com