रेल्वे तिकीटावरून घरफोडीचे आरोपी पकडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

नवी मुंबईः दारावे गाव से. 23 येथील मयुरा ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्याची उकल नेरुळ पोलिसांनी केली असून, आरोपींपर्यंत पोहचण्यासाठी सानपाडा रेल्वे स्टेशनमधून काढलेल्या रेल्वे तिकीटावरून तीन आरोपी झारखंडमधून पकडून आणण्याची व त्यांच्याकडून अंदाजे पाच लाखांचा मूळ मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्ह्यातील अजून आठ ते दहा आरोपींचा नेरुळ पोलीस शोध घेत आहेत.

नवी मुंबईः दारावे गाव से. 23 येथील मयुरा ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्याची उकल नेरुळ पोलिसांनी केली असून, आरोपींपर्यंत पोहचण्यासाठी सानपाडा रेल्वे स्टेशनमधून काढलेल्या रेल्वे तिकीटावरून तीन आरोपी झारखंडमधून पकडून आणण्याची व त्यांच्याकडून अंदाजे पाच लाखांचा मूळ मुद्देमाल हस्तगत केला. या गुन्ह्यातील अजून आठ ते दहा आरोपींचा नेरुळ पोलीस शोध घेत आहेत.

15 मेच्या दरम्यान आरोपींनी से. 23 दारावे गाव येथील मयूरा ज्वेलर्सच्या शेजारील गाळा आंब्याचे व्यापारी म्हणून भाड्याने घेतला. रात्रीच्या वेळी यातील आरोपी अशोक शर्मा व इतर साथीदारांनी मयुरा ज्वेलर्सच्या 9 इंच भिंतीला भगदाड पाडून तेथील तिजोरी गॅस कटरने कापून तिजोरीतील सुमारे 51 लाख रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने लंपास केले होते.

नेरुळ पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यावर पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरु केला. यात पोलिसांना आरोपींनी पळून जाताना सानपाडा रेल्वे स्टेशनवरून काढलेल्या रेल्वे तिकिटावरून झारखंड गाठले. तेथे दहा पंधरा दिवस तळ ठोकल्यानंतर एका आरोपीला अटक केली. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मुंबई व उरण येथून प्रत्येकी एका आरोपीला अटक केली. त्यांच्याकडून 15 तोळे सोन्याचे दागिने व 1 किलो 300 ग्राम चांदीच्या वस्तू हस्तगत केल्या. याची माहिती सह आयुक्त प्रशांत बुरुडे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परी-1 चे उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे, वपोनि. अशोक राजपूत उपस्थित होते. आरोपी अशोक शर्मा, सईद नूर शेख, फिरोज इब्राहिम शेख अशी तीन आरोपींची नांवे असून पोलिसांनी चोरीस गेलेल्या 51 लाखांपैकी अंदाजे 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील तपास पोनि. औटी, सपोनि. सुशीलकुमार गायकवाड, राजेश गज्जल करीत आहेत. सर्व आरोपी झारखंडमधील आहेत.

■ ई सकाळवरील महत्वाच्या बातम्या

"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ!
पवार 'समृद्धी' प्रकल्पाच्या विरोधात कसे?
#स्पर्धापरीक्षा - भारत-अमेरिका संरक्षण करार
'मुदतपूर्व'च्या फुक्‍या जोर-बैठका
पतधोरणाची पावले योग्य दिशेने
रविवारी भारत - पाकचा लंडनला डबल धमाका
भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल
कराल "नायगरा'ने गिळले विक्रमवीरास..
पुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर
लंडन : अग्नितांडवात किमान 65 मृत्युमुखी?
'SCO'त मतभेदांना स्थान नाही
ध्वनिक्षेपकावरून एकाच वेळी 'अजान'
लोकवर्गणीतून 7 कि.मी.पर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण

Web Title: mumbai news thief arrested in jharkhand