48 लाखांच्या घरफोडीप्रकरणी तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

मुंबई - ग्रॅण्ट रोड परिसरात जानेवारीमध्ये झालेल्या 48 लाखांच्या घरफोडीप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी शनिवारी तिघांना अटक केली. त्यात एका महिलेचाही समावेश आहे.

मुंबई - ग्रॅण्ट रोड परिसरात जानेवारीमध्ये झालेल्या 48 लाखांच्या घरफोडीप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी शनिवारी तिघांना अटक केली. त्यात एका महिलेचाही समावेश आहे.

अयुब शरीफ (27), हुसैन अली सरकार (31) व शबिना शेख (45) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी शरीफ व सरकार दोघे मुंब्रा येथील रहिवासी असून, त्यांनी चोरीचा माल शबिनाच्या घरी लपवला होता. या प्रकरणातील तक्रारदार जानेवारीमध्ये गुजरातमधील जामनगर येथे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी सोने-हिऱ्यांचे दागिने, महागडी घड्याळे व 23 लाख रोख रक्कम असा 48 लाखांचा मुद्देमाल चोरला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शरीफ व सरकार यांना एका प्रकरणात संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यांनी या घरफोडीची माहिती दिली. त्यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: mumbai news three arrested in theft